नेपाळच्या पुरात आई-वडील बेपत्ता असताना लेकीने दिली NEET PG परीक्षा; तन्वीचा VIDEO व्हायरल
नेपाळमध्ये महाभयंकर प्रलय आल्याने हजारो लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत ९५० जणांचे मृतदेह सापडले असून साडेचार हजार नागरिकांना शोधण्याची मोहिम सुरू आहे. या प्रलयात अनेक भारतीय नागरिकही अडकले असून त्यांच्याशी अद्याप काहीही संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, भारतातील तन्वी या नीटपीजीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीने अत्यंत हृदयद्रावक कहाणी शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.