नेपाळ महापुरातील अज्ञात मृतदेह पुरणार, अंत्यसंस्कारानंतर कशी पटवणार ओळख?
नेपाळमध्ये आलेल्या महाभयंकर पुरामुळे अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत आणि अनेकजण बेपत्ता आहेत. मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाल्याने प्रशासनाने संसर्ग टाळण्यासाठी मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला आहे. मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा करून त्यांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिले जात आहेत. चितवन जिल्ह्यात सर्वाधिक मृतदेह सापडले असून, प्रशासनाने १.५ मीटर खोल खड्डे खणून मृतदेह पुरण्यास सुरुवात केली आहे.