नेपाळ पूरातून बिहारमध्ये वाहून आले मासे खाल्ल्यानंतर अनेक लोक आजारी; सरकारने दिला इशारा
नेपाळमधील महापुराच्या पाण्याबरोबर बिहारमध्ये वाहून आलेले अनोळखी विदेशी मासे खाल्ल्याने नागरिक आजारी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच नेपाळमधून वाहून आलेल्या विशालकाय माशांचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.