नेपाळ महापूरात २७५ भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता
नेपाळ-तिबेट सीमेवर २६ ऑगस्ट रोजी आलेल्या ढगफुटी आणि महापुरामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. या आपत्तीत अडकलेल्या १६६ भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून २७५ भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. १,३०० हून अधिक मृत्यू झाले असून १२,००० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. भारताने नेपाळला ९५ टन मदत साहित्य आणि ५४ तज्ज्ञांचे पथक पाठवले आहे.