नेपाळच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर कॅप्टन प्रिया अधिकारी यांचा विक्रम
नेपाळच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर कॅप्टन प्रिया अधिकारी यांनी केवळ ६ दिवसांत १०० हून अधिक बचाव मोहिमा राबवून शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. प्रिया अधिकारी यांनी केवळ ६ दिवसांत १०० हून अधिक लोकांचे प्राण वाचवत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रसुवा जिल्ह्यातील तिमुरे गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे बचावकार्य पार पाडले.