Video: लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
सोमवारी (१० नोव्हेंबर) दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका कारमध्ये स्फोट झाला, ज्यात १२ जणांचा मृत्यू झाला. स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एएनआय) प्रकरण सोपविण्यात आले आहे. आरोपी मुझम्मील गनी आणि उमर उन नबी यांचा तपास सुरू आहे. गनीने यावर्षी लाल किल्ला परिसराला अनेकदा भेट दिली होती.