न्या. बीव्ही नागरत्ना होणार देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश? पण कार्यकाळ फक्त ३६ दिवस!
न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी देशाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या पदावर राहतील. त्यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे, परंतु त्यांचा कार्यकाळ फक्त ३६ दिवसांचा असेल. यापूर्वी न्यायमूर्ती कमल नरेन सिंह हे सर्वात कमी म्हणजे १७ दिवस सरन्यायाधीशपदी राहिले होते.