टोल नाक्यावर आजपासून रोख पैसे घेणं बंद; NHAI कडून 100% डिजिटल पेमेंट अनिवार्य
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) १ एप्रिलपासून देशभरातील टोल नाक्यांवर १०० टक्के डिजिटल पेमेंट सक्तीचे केले आहे. यामुळे टोल वसुली प्रक्रिया सुलभ होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल. फास्टॅग किंवा UPI द्वारेच टोल स्वीकारले जातील. फास्टॅग नसलेल्या वाहनांना दंड भरावा लागू शकतो. प्रवाशांनी फास्टॅग खाते सक्रिय ठेवावे आणि पुरेसा बॅलन्स ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.