भारतात मोठा दहशतवादी कट हाणून पाडला; राष्ट्रीय तपास संस्थेची मोठी कारवाई
एनआयएने सहा युक्रेनियन आणि एका अमेरिकन नागरिकाला अटक केली आहे. आरोपींना यूएपीए कलम १८ अंतर्गत अटक करण्यात आली. कोलकाता, लखनऊ आणि दिल्ली विमानतळांवर अटक करण्यात आली. आरोपींनी मिझोराममध्ये प्रवेश करून म्यानमारमध्ये भारतविरोधी गटांशी संपर्क साधला. ड्रोनच्या खेपा युरोपमधून मिझोराममध्ये पोहोचवल्याचा संशय आहे. आरोपींना तीन दिवसांची कोठडी सुनावली असून तपासासाठी कोठडीत वाढ करण्यात आली आहे.