विखे पाटलांची लेक थेट स्वीडनच्या संसदेत! नीला विखे पाटील यांचा ऐतिहासिक विजय
महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांची कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत निवड झाली आहे. नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्यांनी अहमदनगरमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी स्वीडिश राजकारणात अनेक वर्षे काम केले आहे. नीला यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस आणि माद्रिदमधील दी कम्प्ल्युटन्स विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्या बालकल्याण आणि पर्यावरणावर लक्ष केंद्रित करतील.