नितीश कुमारांचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे काय?
बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यामुळे बिहार विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बिहारमधील संभाव्य नेतृत्वबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. नितीश कुमार यांनी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांचे सदस्यत्व मिळवले आहे. भाजपचे नितीन नवीन यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.