अविश्वास प्रस्तावावरील मतदानाची तारीख ठरली; गोंधळ केला तर थेट ‘गिलोटिन’!
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात दाखल अविश्वास प्रस्तावावर ९ मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, विरोधकांनी कामकाजात व्यत्यय आणल्यास गिलोटिनचा वापर केला जाईल. गिलोटिन प्रक्रियेद्वारे चर्चेशिवाय विधेयके मंजूर होतात. विरोधकांनी ओम बिर्ला यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप केले आहेत. ११८ खासदारांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.