ध्वनिप्रदूषणावरून होणारे वाद जीवघेणे का ठरतायत?
गेल्या काही दिवसांत डीजेच्या आवाजावरून वाद वाढले आहेत. पुण्यात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात आवाज उठवल्याने त्यांच्यावर हल्ला झाला. दिल्लीमध्ये गोंगाटावर आक्षेप घेतल्याने मणिपुरी संगीत शिक्षकाचा मृत्यू झाला, तर नोएडामध्ये वाढदिवसाच्या पार्टीतील आवाजावरून वाद झाल्याने एक तरुणाचा मृत्यू झाला. या घटनांमुळे आवाजावरून होणाऱ्या संघर्षाचे गांभीर्य समोर आले आहे.