युद्धात आता उत्तर कोरियाची उडी? बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचे जपानकडून जाहीर
उत्तर कोरियाने पूर्व दिशेने संशयास्पद आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर जपानने तातडीचा इशारा दिला असून जनतेने सतर्क राहावे असे आवाहन केले आहे. जपानच्या तटरक्षक दलाने समुद्रातील जहाजांना इशारा दिला आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या किनाऱ्यावरील समुद्रात सोडले असल्याचे म्हटले आहे.