धक्कादायक! शिक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळले विद्यार्थिंनीचे पाच हजारांहून अधिक अश्लील व्हिडिओ
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मोरारजी देसाई निवासी शाळेत कला शिक्षक मुनियप्पा यांच्याकडून विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केल्यानंतर पाच हजारांहून अधिक नग्न व्हिडिओ सापडले. पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षकाचा फोन फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. मुनियप्पा डिसेंबर २०२४ मध्ये निलंबित झाले होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.