VIDEO : १२ दिवसांपूर्वी घेतलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटर बिघडली, संतप्त तरुणाने शोरूम पेटवलं
कर्नाटकमधील कलबुर्गी येथे ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमला आग लावल्याची घटना घडली. मोहम्मद नदीम (२६) याने २८ ऑगस्ट रोजी नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती, परंतु ती वारंवार बिघडत होती. शोरूममधील कर्मचारी स्कूटर दुरुस्त करण्यात अपयशी ठरल्याने संतापलेल्या नदीमने १० सप्टेंबर रोजी शोरूमला पेट्रोल ओतून आग लावली. या आगीत शोरूममधील सहा स्कूटर जळाल्या. दरम्यान, नदीमला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.