लग्नानंतर दोन महिन्यांत शुभमला दहशतवाद्यांनी केलं ठार, मृतदेहासमोर बसून पत्नीचा मूक टाहो
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यात २६ जण ठार झाले. कानपूरचे शुभम द्विवेदी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. शुभमचे लग्न दोन महिन्यांपूर्वी इशान्याशी झाले होते. हल्ल्यानंतर इशान्या पतीच्या मृतदेहासमोर मूक आक्रोश करत होती. शुभमचे वडील सिमेंट व्यावसायिक आहेत. कुटुंबाने सरकारकडे हल्लेखोरांचा बदला घेण्याची आणि शुभमचा मृतदेह लवकर पाठवण्याची मागणी केली आहे.