“पाकिस्तान ‘त्या’ एक कप चहाची किंमत चुकवतोय”, उपपंतप्रधानांची टीका, ‘त्या’ प्रसंगावर भाष्य
पाकिस्तानची आर्थिक स्थिती चिंताजनक असून जागतिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं आहे. उपपंतप्रधान इशक दार यांनी लंडन दौऱ्यात ब्रिटिश उच्चपदस्थांशी आणि पाकिस्तानी संघटनांशी संवाद साधला. त्यांनी इम्रान खान सरकारवर टीका केली आणि आयएसआयचे माजी प्रमुख फैझ हमीद यांच्या काबूल भेटीवरून संतप्त प्रतिक्रिया दिली. हमीद यांनी दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला.