पाकिस्तानमध्ये लग्नात फक्त एकच पदार्थ वाढण्याचे फर्मान!
मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. नवीन गाड्यांच्या खरेदीवर बंदी, मंत्र्यांच्या परदेशवारीवर मर्यादा, आणि लग्नसमारंभात 'एकच पदार्थ' वाढण्याचे फर्मान जारी केले आहे. दुकाने, मॉल्स, आणि हॉटेल्सच्या वेळा कमी केल्या आहेत. सरकारी खर्चात कपात आणि इंधनाच्या वापरावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.