‘पाकिस्तान इस्रायलचा धाकटा भाऊ, दोघेही शेजाऱ्यांना त्रास देतात’, असदुद्दीन ओवैसींची टीका
पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक तणाव निर्माण झाला आहे आणि भारतासह अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर टीका केली. ओवैसी म्हणाले की, भारताने तटस्थ भूमिका घेतली असती तर शांतता प्रक्रियेत भारताच्या शब्दाला वजन प्राप्त झाले असते. त्यांनी पाकिस्तान आणि इस्रायललाही टोला लगावला.