इराण-इस्रायल युद्धामुळे पाकिस्तान होरपळला; पेट्रोलचे दर लिटरमागे ५५ रुपयांनी वाढले
पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये तेलाच्या तुटवड्याचे संकट उभे राहिले आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ५५ रुपयांची वाढ केली आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे पेट्रोल ३२१ रुपये आणि डिझेल ३३६ रुपये प्रतिलिटर झाले आहे.