पाकिस्तानला चूक उमगली? ट्रम्प यांची नोबेलसाठी शिफारस मागे घेण्याची तयारी?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'आय लव्ह पाकिस्तान' असे विधान केल्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. मात्र, अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानातील नेतेमंडळींनी या शिफारसीवर टीका केली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानप्रेम व्यक्त केले होते. आता पाकिस्तान सरकार शिफारसीचा पुनर्विचार करत आहे.