“मोदींनी माझं सौभाग्य परत आणलंय”, जवानाच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया
२२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी भारतीय जवान पूर्णम शॉ चुकून पाकिस्तानात गेले आणि तिथे २०-२२ दिवस अटकेत होते. अखेर पाकिस्तानने त्यांना सोडले. त्यांच्या पत्नी रजनी शॉ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि सांगितले की पूर्णम शॉ सुरक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांनीही मदत केली, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी होता.