पंतप्रधान मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद; कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?
अमेरिकेच्या संसदेत मंजूर झालेल्या नव्या कायद्यानुसार रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ लादण्याची तरतूद आहे, ज्यामुळे भारत आणि चीनला फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्यापार, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा झाली. जागतिक शांतता आणि सुरक्षा यावरही विचार-विनिमय झाला.