पंतप्रधान म्हणतात ‘सब चंगा सी’ पण प्रत्यक्षात ‘सब महंगा सी’, – काँग्रेसची टीका
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये 'घाऊक किंमत निर्देशांक' (WPI) महागाईचा दर ९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटले की, मोदींच्या 'सब चंगा सी' दाव्यांच्या उलट, वस्तूंच्या किमती वाढत आहेत. जयराम रमेश यांनी महागाईमुळे कोट्यवधी कुटुंबांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. CMIEच्या आकडेवारीनुसार, मजुरीतही घट झाली आहे.