“Is It Okay?” ब्रिक्स परिषदेत मोदींनी भाषण थांबवून चीनच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भाषणादरम्यान "Is It Okay?" असा प्रश्न विचारला. शी जिनपिंग अस्वस्थ दिसत असल्याने मोदींनी भाषण थांबवलं. नंतर दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय बैठक झाली. मोदींनी मतांतरांचे वादात रूपांतर होऊ नये आणि सीमावर्ती भागातील शांतता महत्त्वाची असल्याचं सांगितलं. शी जिनपिंग गाला डिनरला अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आलं.