मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्या खास फोटोची जगभरात चर्चा; ‘ब्रिक्स’मधून काय संदेश दिला?
दिल्लीमध्ये १८ वी 'ब्रिक्स शिखर परिषद' पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेची सुरुवात झाली. परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान सहभागी झाले आहेत. मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांच्या हस्तांदोलनाचा फोटो चर्चेत आहे. तसेच मोदींनी इराणच्या अध्यक्षांबरोबर पश्चिम आशियातील संघर्ष सोडवण्यासाठी संवादाचे आवाहन केले.