भारताकडे कच्च्या तेलाचा साठा किती? मोदींनी राज्यसभेत सांगितला ‘प्लॅन-बी’
पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत व्यक्त केली. त्यांनी शांततेचे आवाहन करत भारताच्या इंधन सज्जतेबद्दल माहिती दिली. भारताने ५३ लाख मेट्रिक टन सामरिक तेलसाठा निर्माण केला असून, आणखी ६५ लाख मेट्रिक टनची भर घालण्याचे काम सुरू आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील अडथळ्यांमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.