“दहशतवादाच्या परिसंस्थेचा नायनाट करावा लागेल”, मोदींचा थेट इशारा
सर्व प्रकारचे तणाव आणि युद्धे रणांगणावर नव्हे, तर संवादाच्या माध्यमातूनच सोडवली जाऊ शकतात, असं म्हणत दहशतवादासाठी होणारा अर्थपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने या संपूर्ण परिसंस्थेचा आपल्याला नायनाट करावा लागेल, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत केलं. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही उपस्थित होते.