अमेरिका-इराणमधील कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींने केले स्वागत, पहिली प्रतिक्रिया समोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे स्वागत केले आहे. या करारामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक सुरळीत होईल आणि शांतता निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिका आणि इराणमधील युद्ध समाप्त करण्यासाठी आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्यासाठीचा करार स्वित्झर्लंडमध्ये १९ जून रोजी स्वाक्षरी होणार आहे. करारामुळे पश्चिम आशियातील स्थैर्य आणि व्यापार सुरळीत होण्यास मदत होईल.