रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मोदी अन् शी जिनपिंग मध्यस्थी करणार? ‘क्रेमलिन’ची माहिती
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी शांतता चर्चेत मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या तयारीचं स्वागत केलं आहे. परिषदेदरम्यान मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांच्या हस्तांदोलनाचा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे, ज्यातून नेत्यांमधील परस्पर सामंजस्य आणि एकजुटीचा संदेश दिला गेला आहे.