एक्सपायर झालेले न्यूडल्स खाल्ल्यानंतर मुलगी आजारी; ग्राहक मंचाकडून मिळाली मोठी भरपाई
हिमाचल प्रदेश ग्राहक आयोगाने रिलायन्स रिटेलला एक्सपायरी डेट उलटून गेलेले न्यूडल्स विकल्याबद्दल दंड ठोठावला आहे. जुगल किशोर यांनी रिलायन्स स्मार्ट पॉईंटमधून विकत घेतलेल्या न्यूडल्समुळे त्यांच्या मुलीची तब्येत बिघडली. आयोगाने रिलायन्सला २०,००० रुपये नुकसान भरपाई आणि कायदेशीर खर्च परत करण्याचे आदेश दिले. रिलायन्सने जबाबदारी नाकारली, परंतु आयोगाने ग्राहकाच्या बाजूने निर्णय दिला.