‘पंतप्रधान मोदी इराण युद्ध थांबवू शकतात’ अमेरिकेच्या माजी कर्नलचे मोठे विधान
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाला एक महिना झाला आहे आणि युद्धविरामासाठी विश्वासार्ह मध्यस्थाची गरज आहे. अमेरिकेचे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्धविरामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भारताची आर्थिक आणि लष्करी ताकद, तसेच जागतिक स्तरावर असलेला विश्वास यामुळे मोदी हे योग्य मध्यस्थ ठरू शकतात. ट्रम्पही मोदींचे ऐकू शकतात, असे मॅकग्रेगर यांनी नमूद केले.