‘ऑपरेशन सिंदूर’वर पंतप्रधांनानी पहिल्यांदाच साधला जनतेशी संवाद!
२२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. याच्या प्रत्युत्तरात भारताने ७ मे पासून ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली, ज्यात पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कर, गुप्तहेर खातं आणि वैज्ञानिकांचे कौतुक केले आणि ऑपरेशन सिंदूरला देशाच्या भावनांचं प्रतिबिंब म्हटलं.