“या देशानं असाही काळ पाहिलाय जेव्हा…”, मोदींची काँग्रेसवर टीका; राहुल गांधींच्या उपस्थितीत
७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकावून भाषण केले. यावेळी त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन, समान नागरी कायदा यांसारखे मुद्दे मांडले. अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सुधारणा, मायबाप संस्कृतीचा उल्लेख केला. राहुल गांधीही समोर उपस्थित होते. देशातील विकृत व्यक्तींपासून सावध राहा, असं म्हणताना त्यांनी कुणाचा उल्लेख मात्र केला नाही.