पंतप्रधान मोदी, ट्रम्प यांची जी७ मध्ये प्रत्यक्ष भेट; काय चर्चा झाली?
फ्रान्समध्ये जी-७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १६ महिन्यांनी समोरासमोर आले. परिषदेसाठी दोन्ही नेते उपस्थित होते आणि त्यांनी स्मितहास्य करत एकमेकांना अभिवादन केले. फेब्रुवारी २०२५ मधील वॉशिंग्टन भेटीनंतर ही त्यांची पहिलीच भेट आहे. भारत-अमेरिका संबंधांतील तणावामुळे या भेटीकडे जगाचे लक्ष लागले आहे.