“तुषार गांधींचं बरोबरच आहे, RSS हा कर्करोग”, काँग्रेसचं समर्थन; केरळमध्ये सत्ताधारी-विरोधक
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली. त्यांनी RSS ला देशाचा आत्मा नष्ट करणारे विष म्हटले. भाजपाने त्यांच्या विधानावर संताप व्यक्त करत माफी मागण्याची मागणी केली, परंतु तुषार गांधींनी ती नाकारली. केरळमधील सत्ताधारी माकप व काँग्रेस तुषार गांधींच्या बाजूने उभे राहिले असून, त्यांनी RSS वर हल्लाबोल केला आहे.