इराणवर अणुबॉम्ब टाकला जाणार? संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारून महिना झाला आहे, तरीही मार्ग निघालेला नाही. संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी मोहम्मद सफा यांनी इराणमध्ये अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराची तयारी होत असल्याचा आरोप करत राजीनामा दिला. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत तेहरानच्या फोटोसह लोकांना युद्धाचे गांभीर्य समजावले. तेहरानमध्ये असंख्य कुटुंबे आणि सामान्य कष्टकरी लोक आहेत, असे त्यांनी नमूद केले.