गर्भवती पत्नीसह दोन मुलींनाही स्वीमिंग पुलमध्ये ढकललं; मुलगाच पाहिजे म्हणून पतीचा क्रूरपणा
तेलंगणातील वारंगल-खम्मम राष्ट्रीय महामार्गावरील स्विमिंग पूलमध्ये गरोदर फरहान (२६) आणि तिच्या दोन मुली उमेरा (८) आणि आयेशा (६) यांचे मृतदेह आढळले. पती अजहरुद्दीनने सुरुवातीला अपघात सांगितला, परंतु फरहानच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे पोलिसांच्या तपसाला वेग आला अन् वेगळीच माहिती समोर आली.