३ ट्रेन, रिकामा ट्रॅक अन् ३ तास लॉकडाऊन! राष्ट्रपतींच्या रेल्वे प्रवासाची ‘अदृश्य’ सुरक्षा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशातील भुवनेश्वर ते ब्रह्मपूर असा विशेष रेल्वेने १७० किमीचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान एकाच वेळी पायलट, मुख्य आणि रिअर एस्कॉर्ट अशा तीन रेल्वेगाड्यांचा वापर करण्यात आला. प्रतिकूल हवामानामुळे विमानाऐवजी रेल्वे मार्गाची निवड केल्याने अत्यंत गुंतागुंतीचे 'ट्रॅक सॅनिटायझेशन', ३ तास आधी स्टेशन बंद करणे आणि 'सुरक्षित रेल्वे कमांड कॉरिडॉर' यांसारखे विशेष सुरक्षा संकेत लागू करण्यात आले. ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या या व्हीव्हीआयपी रेल्वे परंपरेची संपूर्ण माहिती.