विमानात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय नागरिक दोषी, ७ मे रोजी सुनावली जाणार शिक्षा
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या वरुण नावाच्या ३८ वर्षीय तरुणाला विमानात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. २०२४ मध्ये रोनाल्ड रीगन वॉशिंग्टन विमानात ही घटना घडली होती. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर वरुणला २०२५ मध्ये अटक करण्यात आली. कोर्टाने त्याला दोषी ठरवून ७ मे रोजी शिक्षा सुनावणार आहे. वरुणला दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.