चणे, तूर, मूग, वाटाणे महागले; दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळींचे दरही कडाडणार? कारण काय?
दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या तोंडावर चणे, तूर, मूग आणि वाटाण्यासारख्या प्रमुख कडधान्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनच्या (IPGA) आकडेवारीनुसार, गेल्या महिनाभरात घाऊक बाजारात डाळींच्या किमती ६ ते ११ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. पुरवठा साखळीतील अनिश्चिततेमुळे आगामी काळात डाळींचे दरही चढेच राहण्याची शक्यता आहे.