पंजाबमध्ये भाजपाला अपयश; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ‘आप’चा मोठा विजय
पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने (आप) वर्चस्व सिद्ध केले आहे. आठ महानगरपालिका, ७५ नगरपालिका आणि २० नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये 'आप'ने ९५४ प्रभागांमध्ये विजय मिळवला. काँग्रेसने ३९०, अपक्षांनी २५१, शिरोमणी अकाली दलाने १९१ आणि भाजपाने १७० प्रभागांमध्ये विजय मिळवला.