अपहरण करून झाडाला बांधलं, नंतर पेटवून दिलं; दोन महिन्यांनी इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
प्रसिद्ध पंजाबी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर (वय २८) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला अपहरण करून झाडाला बांधून पेटवून देण्यात आले होते. चंदीगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या संथ कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मनजीत कौरचे इन्स्टाग्रामवर १.४६ लाख फॉलोअर्स होते.