Video: कारवाईनंतर चढ्ढांचा ‘आप’ला इशारा; म्हणाले, “मी शांत झालोय, पराभूत नाही”!
आम आदमी पक्षाने राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना उपनेतेपदावरून हटवल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चढ्ढा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे पक्षाला जाब विचारला आणि सूचक इशारा दिला. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला चढ्ढा यांना बोलण्याची संधी न देण्याची सूचना केली आहे. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.