महाग सामोसे, मोबाइल रिचार्ज, खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत मांडले हे ७ मुद्दे
आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा सध्या पक्षांतर्गत संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत. राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर त्यांनी महत्त्वाचे प्रश्न मांडल्याचा दावा केला. त्यांनी पितृत्व रजा, मेट्रो शहरांतील वाहतूक कोंडी, टेलिकॉम कंपन्यांचे २८ दिवसांचे रिचार्ज, मासिक पाळीचे आरोग्य, विमानतळावरील खाद्यपदार्थ, राईट टू रिकॉल, आणि गिग वर्कर्सच्या समस्यांवर भाष्य केले. त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.