“PM मोदींनी अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही”; राहुल गांधीचा जोरदार हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आरोप केला की, मोदींनी व्यापार कराराद्वारे भारताचे कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले केले आहे, ज्यामुळे भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होतील. तसेच, मोदींनी अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नसल्याचे सांगून, ते ट्रम्प यांच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप केला. भाजप आणि आरएसएसवरही आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा आरोप त्यांनी केला.