सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्यानंतर राहुल गांधी आक्रमक; तरुणांना केलं महत्त्वाचं आवाहन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'इंडिया' आघाडीचे नेते एकत्र आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट नाकारल्यानंतर, आघाडीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सरकारला इशारा दिला की, "कितीही वेळ लागला तरी आम्ही मागे हटणार नाही." त्यांनी दुपारी दीड वाजता सर्वोच्च न्यायालयात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.