राहुल गांधींनी कन्हैया कुमार यांना का झापले? NSUI च्या पराभवाबद्दल कोणते प्रश्न विचारले?
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) निवडणुकीत एनएसयूआयचा पराभव झाल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्हैया कुमार आणि विनोद जाखड यांना बैठकीसाठी बोलावले. राहुल गांधींना डुसूमधील एनएसयूआयचा पराभव खटकला आहे, याबाबत त्यांनी दोन्ही नेत्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच दीपांशू शौकीन यांना तिकीट का नाकारले? यावरुन गांधींनी कन्हैया कुमार यांना झापले आहे.