“परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय”, राहुल गांधींची टीका
केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्याआधी पाकिस्तानला पूर्वसूचना दिल्याचं म्हटलं होतं. यावर राहुल गांधी यांनी टीका करत, हे कृत्य गुन्हा असल्याचं सांगितलं. त्यांनी विचारलं की, पाकिस्तानला कळवल्यामुळे आपण किती भारतीय विमानं गमावली? जयशंकर यांनी उत्तर न दिल्याने राहुल गांधींनी त्यांच्या मौनाला निंदनीय म्हटलं. भाजपाने राहुल गांधींवर टीका केली, तरीही त्यांनी आपला प्रश्न कायम ठेवला.